सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश, २ तरुणीची सुटका ; गुन्हे शाखेच्या कक्ष- ७ ची कामगिरी

मुंबई:  सेक्स टुरिझम या गोंडस नावाखाली तरुणींना
ग्राहकासोबत भारतातल्या मनपसंत ठिकाणी फिरण्यासाठी पाठवला जायचं.याच सेक्स टुरिझम रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश करत गोव्याला जाताना सोबती म्हणून मुली पुरवणाऱ्या दोन महिला दलालांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देशांतर्गत विमानतळावरून अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन तरूणींची सुटका करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष-७ च्या पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी अबरून अमजद खान ऊर्फ सारा (४०) व वर्षा दयालाल परमार (२५) या दोघींना मंगळवारी देशांतर्गत विमानतळाच्या प्रवेशद्वारावर अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या कक्ष-७ पथकाला एक महिला वेगळ्या प्रकारे सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली होती. या महिलेला याआधीही 2020 मध्ये वेश्याव्यवसाय प्रकरणात अटक केली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी डमी ग्राहक तयार केले. त्यांच्यामार्फत महिला दलालांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी मुंबईत वेश्या व्यवसायावर कारवाई होत असल्यामुळे मुली गोव्याला येण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.

पोलिसांनी पाठवलेल्या ग्राहकांनी त्याला होकार दिला असता महिला दलालाने ४० हजार रुपये दलाली व मुलीचे ५० हजार रुपये इतक्या रक्कमेची मागणी केली. दोन मुलींसाठी आगाऊ २० हजार रुपये विमानतळावर स्वीकारण्यासही होकार दिला. दूरध्वनीवर सर्व ठरल्यानंतर दोन पीडित मुलींना घेऊन खान व परमार सोमवारी सांताक्रुझ येथील देशांतर्गत विमानतळावर आल्या असताना त्यांना ताब्यात घेतले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.