हडपसर मधील त्या खुनाचे गूढ उकलले ; या कारणावरुन मोठ्या भावानेच केली धाकट्या भावाची पंख्याच्या पात्याने गळा चिरून हत्या

पुणे :दारुच्या आहारी गेलेल्या लहान भावाकडून सतत पैसे मागण्यामुळे कंटाळलेल्या मोठ्या भावाने लहान भावाचा झोपेत असताना पंख्याच्या पात्याने गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. हि घटना हडपसर परिसरातील पंधरा नंबर चौकाच्या परिसरात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मोठ्या भावाला अटक केली आहे

बाबू उर्फ प्रदीप शिवाजी गवळी ( वय 23 रा, 15 नंबर, हडपसर, मुळ रा.तुळजापूर ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मनोज शिवाजी गवळी (वय 28) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरवी नितीन श्रीरंग बनसोडे ( वय 32 रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्रदीप व मनोज हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. प्रदीप रिक्षा चालवत होता. तर मनोज हा ट्रॅव्हल्स बसेससाठी काम करत होता.दोघेही हडपसरमधील 15 नंबर परिसरात खोली भाड्याने घेऊन एकत्र राहात होते. प्रदीप हा रिक्षा चालविण्याचे काम करीत होता. तर मनोज हा खासगी ट्रॅव्हल्स बससाठी प्रवासी शोधण्याचे काम करीत आहे. मनोजच्या पत्नीला प्रदीपचे घरी राहणे आवडत नव्हते. त्यावरुन मनोज व त्याच्या पत्नीमध्ये सातत्याने वाद सुरू होते. सातत्याने होणाऱ्या वादाला कंटाळून मनोजची पत्नी गावाला निघून गेली होती. प्रदीपला दारुचे व्यवसन होते, त्यातुनच तो दारु पिण्यासाठी मनोजकडे सतत पैशांची मागणी करीत होता.प्रदीपचे दारुचे व्यसन व बाहेरख्याली वर्तनामुळे मनोज कंटाळला होता. प्रदीप सोमवारी रात्री खोलीमध्ये झोपला होता. त्यावेळी मनोजने मध्यरात्रीच्या सुमारास घरातील पंख्याच्या पात्याने प्रदीपचा गळा कापून त्याचा खुन केला. हि घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. त्यानंतर पोलिसांनी मनोजला अटक केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

प्रदीप त्यांच्या घरी राहत असल्याचे मनोजच्या पत्नीला आवडत नव्हते. यामुळे त्यांच्यात वाद व्हायचे. प्रदीपच्या वर्तनामुळे व व्यसनांमुळे मनोज कंटाळला होता. सोमवारी रात्री प्रदीप झोपला असताना मनोजने त्याचा खून केला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.