मालकिणीचे अंर्तवस्त्र घालून त्याचे फोटो काढले, घाणेरडया आवाजात बोलून महिलेला अश्लिल इशारे करत विनयभंग

पुणे : घरकामासाठी ठेवले असताना मालकिणीचे अंर्तवस्त्र घालून त्याचे फोटो काढून कामाचे उरलेले पैसे घेण्याचा बहाणा करुन महिलेचा विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी याप्रकरणी गौतम नावाच्या 22 वर्षीय तरूणाला अटक केली आहे. याबाबत एका ५५ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा या महिलेकडे जुलै ते १६ सप्टेंबर २०२१ दरम्यान कामाला होता.

यावेळी काम करीत असताना त्याने या महिलेचे अंर्तवस्त्र घालून त्याचे फोटो काढले. त्यांनी त्याला कामावरुन काढून टाकल्यावर ‘मै आपको बजाऊंगा’ असे घाणेरडया आवाजात बोलून फिर्यादी यांना वेगवेगळ्या फोनवरुन सतत फोन करीत होता. त्याचे कामाचे उरलेले पैसे घेण्याच्या बहाण्याने घरी येऊन फिर्यादीकडे पाहून अश्लिल इशारे करुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन त्याने केले. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक केंजळे तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.