दुकानदारांना लुटणाऱ्या फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ ची कामगिरी

पुणे : दुकानदारांना मारहाण करून त्यांना लुटून फरार असलेल्या टोळीतील एका आरोपीला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ च्या गुन्हे शाखेने अटक केले आहे. निखिल संतोष मिसळ (रा.राजगे आळी, मुंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहन चोरी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर यांचे अधिपत्याखाली येरवडा पोलीस ठाणे व मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात गस्त घालीत होते. गस्त घालीत असताना  पोलीसांनी माहिती मिळाली की, गुन्ह्यातील निष्पन्न पाहिजे असलेला आरोपी निखिल संतोष मिसळ हा कल्याणी नगर गोल्ड ऍडलाब थिएटर पुणे जवळ चे पान टपरी जवळ थांबला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार राजेश लोखंडे, दिनकर लोखंडे, विनायक रामाणे, शाकीर खान, पोलीस नाईक, गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ यांच्या पथकाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.