महाविद्यालये,शाळांजवळील हॉटेलमध्ये मद्यविक्री जोमात.

लोणी काळभोर : पूर्व हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात सध्या शाळा,कॉलेज जवळ अवैध मद्यविक्रीला ऊत आलेला आहे.शाळा,कॉलेज व रुग्णालयाजवळील हॉटेलमध्ये सर्रासपणे मद्य विक्री केली जात असल्याने शाळेत जाणारे विध्यार्थी,पालक व शिक्षक वर्गाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने या बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये लॉकडाऊनच्या काळात थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला असून अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत.लोणी स्टेशन परिसरात एका मोठ्या शिक्षण संकुलात शिक्षण घेणारी असंख्य विध्यार्थी रोज रात्री अश्या अवैध विक्री करणाऱ्या हॉटेल्समध्ये जाऊन व्यसनाधीन होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे हेतू पुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.लॉकडाऊन काळात लपून-छपून दारू विक्री सुरू होती. लॉकडॉऊन झाल्यानंतर शासनाने सरकारमान्य देशी व विदेशी दारू दुकानांना काही अटी व शर्तीच्या अधीन राहून दारू विक्रीला रीतसर परवानगी दिली.परंतु बेकायदेशीर मद्य विक्री करणारे मात्र बिनधास्तपणे दारू विक्री करीत असून यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.नुकतीच लोणी काळभोर पोलिसांनी गावठी दारू विक्री करणाऱ्या भट्टीवर कारवाई करीत भट्टी नष्ट केली.परंतु परिसरात अवैध मद्यविक्री करणारे मात्र बिनधास्तपणे विक्री करीत असल्याने राज्य उत्पादन शुल्क व लोणी काळभोर पोलिसांना हे निदर्शनास येत असून देखील कारवाई का होत नाही हा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.