हिंजवडीमधील ‘स्पा सेंटर’ मध्ये भलतेच ‘उद्दोग’ सुरु

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मधील हिंजवडी परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालत असल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यात एका महिलांची सुटका करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.ही कारवाई बुधवारी (दि. 20) सायंकाळी सव्वासहा वाजता व्हाईट स्क्वेअर बिल्डिंग, हिंजवडी रोड, हिंजवडी येथील ‘स्टील वॉटर थाय स्पा’ येथे करण्यात आली.

गणेश शिवा उपाध्याय (वय 26, रा. हिंजवडी), श्रीकांत दत्तात्रय भालके (वय 28, रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुके यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरातील “स्टील वॉटर थाय स्पा ” सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली जबरदस्तीने मुलींकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जातअसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये एका महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपी पीडित महिलेकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.