दरोडयाच्या तयारीत असणाया सराईत गुन्हेगारांना अटक, गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी

पुणे : दरोडयाच्या तयारीत असणाया ४ सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांनीअटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ७ गुन्हे उघडकीस आणून गुन्हयामध्ये जबरी चोरी केलेले ६६ हजार ५०० रुपये किंमतीचे एकूण ७ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.

अक्षय बाबासाहेब लोंढे (वय २४ वर्षे, रा. वानवडी, पुणे), नितीन प्रकाश शिनगारे (वय ३८ वर्षे, रा. पठारेवस्ती, लोणी काळभोर, पुणे), नवनाथ जनार्दन सावंत (वय ४१ वर्षे, रा. पुणे स्टेशन, पुणे), मोहमद गौसपाक हाजीमलंग शेख (वय २३ वर्षे, रा. मंगळवार पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय लोंढे उर्फ चिकटया व त्याचे साथीदार हे बकोरी गाव ते कोळपेवाडी रोडवर बकोरी गावचे हद्दीत ओढयाजवळ अंधारात सार्वजनिक रोडवर येणार्या जाणारे वाहने तसेच पादचायांना अडवून लूटमार करून
दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ४ आरोपींना ताब्यात घेतले. तर अंधाराचा फायदा घेवून त्यांचा एक साथीदार पळून गेला.त्यांच्याकडे दरोडा टाकण्याकरिता लागणारे साहित्य त्यामध्ये कोयता, चाकू, मिरची पूड, नायलॉन दोरी इ. एकूण ६३६  रु चे साहित्य मिळून आल्याने त्यांच्याविरूध्द लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना नमूद गून्हयामध्ये अटक करण्यात आली.

त्यांना न्यायालयामध्ये हजर करून त्यांची चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करून त्यांच्याकडे कसून तपास केला असता आरोपी अक्षय लोंढे याने त्याच्या साथीदारासह जबरी चोरीचे ७ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी  नमूद गुन्हयामध्ये जबरी चोरी केलेले ६६ हजार ५०० रुपये किंमतीचे एकूण ७ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त पुणे शहर डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे – २ लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा  युनिट- ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, पोउनि सुधीर टेंगले, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.