लग्नाचे आमिष दाखवून २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून कंपनीत बरोबर काम करीत असलेल्या तरुणीचा बलात्कार केला. नंतर लग्न न करता तिची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर २०१५ ते २२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला आहे.

किरण अशोक शिंदे  (वय २९, रा. म्हाडा सोसायटी, चंदननगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी वडगाव शेरी  येथील एका २७ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी हे विमाननगर येथील एकाच कंपनीत कामाला आहेत. एकत्र नोकरी करीत असताना आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या रुमवर नेऊन तिची इच्छा नसताना तिच्याबरोबर शारीरीक संबंध निर्माण केले. त्यानंतर या तरुणीने लग्नाविषयी विचारले असता त्याने लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली.
पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.