लहान बाळाला ढकलून दिल्याच्या कारणावरून एकाचा खून
पिंपरी चिंचवड : लहान बाळाला ढकलून दिल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून हत्याराने डोक्यात, हातावर, पायावर मारून एकाचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 23) दुपारी साडेतीन ते साडेपाच वाजताच्या सुमारास मोहिते निघोजे या रस्त्यावर घडली.
प्रवीण रामदास गवारी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संदीप रामदास गवारी (वय 42, रा. मोई, ता.खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश उर्फ बंटी जयवंत येळवंडे (रा. मोई, ता.खेड) आणि त्याचे दोन ते तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मयत भाऊ प्रवीण गवारी याने आरोपी महेश याच्या घरी जाऊन त्याच्या लहान बाळाला ढकलून दिले होते. या कारणावरून आरोपींनी प्रवीण यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने घराबाहेर नेले. मोई ते निघोजे
जाणाऱ्या रस्त्यावर अजित गवारी यांच्या घराजवळ नेऊन आरोपींनी प्रवीण यांना दारू पाजली. त्यानंतर हत्याराने प्रवीण यांच्या डोक्यात, हातास आणि पायाला मारहाण करून गंभीर दुखापत केली. यामध्ये प्रवीण गवारी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी
आरोपी महेश याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!