कोल्हापूरात गोवा बनावटीची दारू जप्त; राज्य उत्पादनची कारवाई, 21 लाखांची दारू जप्त
कोल्हापूर : टेम्पोच्या छतात चोर कप्पे करून त्यातून मद्याची तस्करी करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज उघडकीस आणला. गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले परिसरात पथकाने रात्री छापा टाकला. यामध्ये २१ लाख ४० रुपयाचा गोवा बनावटीचा मद्यसाठ्यासह ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संभाजी बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
विभागाने दिलेली माहिती अशी की, गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले इथून गोवा बनावटीच्या मद्य साठ्याची बेकायदेशीररित्या वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले जांभुळवाडी येथे जंगलात काही लोक गोवा बनावटीची दारू एका आयशर टेम्पोत छुपे कप्प्यात भरत असल्याच निदर्शनास आले.
दरम्यान, कारवाईची चाहूल लागताच या मद्याची वाहतूक करणारे तिथून पसार झाले. यावेळी भरारी पथकाने गोवा बनावटीच्या मद्याचे सुमारे 21 लाख रुपये किमतीचे 329 बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला 10 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा सुमारे एकतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक विजय नाईक, संजय मोहिते, कर्मचारी संदीप जानकर, सचिन काळे, सागर शिंदे, राजू कोळी, जय शिनगारे आणि मारुती पोवार यांनी केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!