पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
शुभम महेश काटे (वय २१, रा. पदमावती) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी या मुलीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांच्या १४ वर्षाच्या मुलीशी काटे याने मागील दोन ते तीन वर्षांपासून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर पदमावती येथे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध केले. ही बाब शनिवारी तिच्या आईला समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक बुनगे तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!