हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला, वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरु

पुणे :पुण्यातील हडपसरमध्ये बिबट्याने एका तरुणावर हल्ला केला आहे. गोसाई वस्ती, सिरम कंपनीमागे आज पहाटे बिबट्या आला होता. मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका तरुणावर त्याने हल्ला केला आहे. ही घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पुणे पोलिसांनी बिबट्याचा शोध सुरू केला आहे.

संभाजी बबन आतोडे (४५) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या चेहऱ्याला आणि पायाला जखमा झाल्या आहेत. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हडपसर पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली.

आटोळे आणि त्याचा मित्र अमोल लोंढे हे गोसावी वस्तीत फिरत असताना लोंढे यांच्यावर बिबट्याने झेप घेतली. मात्र, तो डगमगला आणि बिबट्याने आटोळे यांचा पाय पकडला. दोघेही घाबरले आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. इतर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनीही तेथे धाव घेतल्याने बिबट्याने पळ काढला.

आटोळे यांना रुग्णालयात नेण्यात आले. नागरिकांनी पोलीस आणि वनविभागाला याची माहिती दिली, त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून बिबट्याचा शोध सुरू केला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.