पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
पिंपरी चिंचवड :पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील पण खोट्या केसमध्ये अडकविण्याची पतीला धमकी दिली. पत्नीसह सासरवाडीच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरीत घडली आहे. ढोरे नगर गल्ली, जुनी सांगवी येथे २ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी पत्नीसह चार जणांवर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
प्रसाद उमेशराव देशमुख (वय ३४), असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत प्रसाद यांच्या आईने सोमवारी (दि. २५) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, प्रसाद यांची पत्नी, सासू, विशाल, राजेंद्र (सर्व रा. सुभाष नगर, येरवडा) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा मुलगा प्रसाद याला खोट्या तक्रारीत अडकवण्याची व मुलाचे तोंड पाहून देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच, तुझ्या नातेवाईकांशी कुठलाही संबंध ठेवू नये, यासाठी दबाव टाकला. तू मर तू मर, असे म्हणून आरोपी पत्नीने त्रास दिला. शिवीगाळ करून दमदाटी केली. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रसादने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक के. एस. गवारी तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!