व्यवसायाच्या बहाण्याने पैसे घेऊन अडिच कोटीची फसवणूक

पिंपरी चिंचवड : व्यवसायाच्या बहाण्याने पैसे घेऊन ते परत न करता तब्बल दोन कोटी 48 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2008 ते जानेवारी 2016 या कालावधीत वैभवनगर, पिंपरी येथे घडली.

दिलीप जवाहरमल वरयानी (वय 52, रा. वैभवनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी किशोर गुरुमुखदास अहुजा (वय 49, रा. पिंपरी) यांनी  फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरयानी यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांकडून व्यवसायासाठी पैसे घेतले. फिर्यादी यांच्यासोबत भागीदारीचा करारनामा करतो आणि त्यांच्या नावाने टेंडर घेतो असे खोटे सांगून फिर्यादी यांच्याकडून दोन कोटी 48 लाख 50 हजार रुपये वेळोवेळी घेतले. ते पैसे परत न करता फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांची वरयानी यांनी फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.