हडपसर : अखेर ‘त्या’ बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश

पुणे : पुण्यातील हडपसर येथील सिरम इन्स्टिटय़ूट कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या गोसावी वस्ती येथील मोकळ्या जागेत आज सकाळी मॉर्निंग वॉक गेलेल्या व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली होती.मात्र अखेर काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घटना स्थळापासुन 100 मीटरच्या अंतरावर बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. साडे आकरा वाजता पिंजऱ्यातून बिबट्याला कात्रज प्राणी संग्रहालयात नेण्यात आले. नागरिकांनी हा थरार अनुभवत सुटकेचा नि:श्वास सोडला.

काल पहाटे (ता.२६) संभाजी आटोळे व अमोल लोंढे हे पाहटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूट मागील गोसावीवस्तीत असलेल्या गावदेवी मंदिर परिसरात मॉर्निंग वॉकला गेले होते. येथे असलेल्या मोकळ्या जागेला अर्ध्या मार्गापर्यंत पेव्हिंग ब्लॉकचा ट्रेक बनविण्यात आला आहे. त्याशेजारील मैदानावर मोठ्याप्रमाणात गवत वाढले आहे. या ट्रेकवर हे दोघे चालत होते. शेवटच्या टोकापासून पुन्हा मागे वळल्यावर शेजारील गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने आटोळे यांच्या अंगावर झेप घेतली. सोबतचे लोंढे यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने वस्तीच्या बाजूला पलायन केले. यामध्ये आटोळे यांच्या छाती, कबंर, हात, पाय व मांडीवर बिबट्याची नखे ओरखडून जखमा झाल्या आहेत. त्यांना ससून रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते.. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाल्यावर आसपासच्या परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेतला.

https://youtube.com/shorts/bkuUXB-3sGQ?feature=share

 

मात्र काही केल्या शोध लागत नव्हता.त्यावर आज रात्री गस्त घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रात्री 8 च्या नंतर गस्त घातली. तेव्हा आम्हाला घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या दोन्ही घरांच्यामधील रस्त्यात बिबटय़ा असल्याचे दिसून आला.त्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाळी टाकून पकडण्याचा प्रयत्न केला.मात्र तरी देखील काही यश आले नाही. सर्व प्रयत्न करून देखील बिबटय़ाला पकडता येत नव्हते.

त्यामुळे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, रेस्क्यू टीम व पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक तरूणांच्या सहकार्याने रेस्क्यू टीमने चोहोबाजूंनी जाळी लावण्याचे काम करून बिबट्याला गनच्या साह्याने तीन इंजेक्शन मारून बेशुध्द केले. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करून ओढून बाहेर काढले. बोळी अतिशय अरूंद असल्याने टीमला मोठी कसरत करावी लागली. बघ्यांची यावेळी मोठी गर्दी झाली होती.

उपवनसंरक्षक राहुल पाटील व सहाय्यक वनसंरक्षक अशुतोस शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, वनपरिमंडल अधिकारी एम. व्ही सपकाळे, समीर इंगळे, वनरक्षक मधुकर गोडगे, बी. एम. वायकर, एस. बी. गायकवाड, ए. आर. गायकवाड, गणेश म्हस्के, सुभाष झुरंगे, रेस्क्यू टीमचे समन्वयक अनुज खैरे यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून माहिती घेतली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी येथे दिवसभर पोलिस बंदोबस्त लावला होता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.