किरण गोसावी अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे :आर्यन खान प्रकरणी चर्चेत आलेला आणि पुणे पोलिसांनी फसवणूकीच्या गुन्ह्यात फरारी घोषीत केलेला संशयित आरोपी किरण गोसावी याला अखेर पुणे पोलिसांनी पकडले आहे. बुधवारी रात्री त्याला कात्रज भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. किरण गोसावी हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशपर्यंत जाऊन आले होते. मात्र तो हाती लागला नव्हता. किरण गोसावीने उत्तर प्रदेश पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे नकार मिळाल्यानंतर तो पुण्यात आला होता. तिथे तो पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार असल्याची चर्चा होती. मात्र रात्री पुणे पोलिसांना त्याला ताब्यात घेतले. ”पुण्यात २०१८ ला किरण गोसावीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. त्यावेळेस त्याला फरारी म्हणून घोषित केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.”

”किरण गोसावीने फसवणूक केल्यानंतर त्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास सुरू होता पण त्याला अटक करण्यात आली नव्हती. म्हणूनच त्याला फरार घोषित करण्यात आले असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. अजून काही गुन्हे असतील तर ते पण दाखल करण्यात येतील असंही ते यावेळी म्हणाले आहेत. ”

”लखनऊ, फत्तेपुर, लोणावळा अनेक ठिकाणी किरण गोसावी फिरला. त्याला शोधण्यासाठी पथके पाठवली होती. किरण गोसावी याने सचिन पाटील नाव वापरल होत. त्या नावाने हॉटेलमध्ये राहत होता. आता कात्रज मधून किरण गोसावी ला ताब्यात घेतल आहे.”

”गोसावीची मेडिकल आणि कोरोना टेस्ट केल्यानंतर कोर्टात हजर केल जाणार आहे. किरण गोसावीला लगेच मुबंई पोलिस किंवा एनसीबी ला देण्याआगोदर त्याच्या पुण्यातील गुन्ह्याचा तपास केला जाईल. पुण्यातील तपास संपल्यानंतर कुठल्याही संस्थेला चौकशी ला देऊ असाही ते म्हणाले आहेत.”

”किरण गोसावी Stop crime organaisation अशी एनजीओ चालवत असल्याचे सांगत होता. तसेच मुलांना परदेशात नोकरी लावून देण्याबरॊबरच इम्पोर्ट एक्स्पोर्टचा धंदा करत असे असंगी माहिती गुप्ता यांनी यावेळी दिली.”

के. पी. गोसावी नेमका कोण? –

किरण गोसावी हा देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचे मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. तसेच आर्यन खान प्रकरणात किरण गोसावी हा पंच आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

2018 मध्ये गोसावी याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी असण्यासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्याला मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार होता. त्यामुळे फसवणुकी संदर्भात फरासखाना पोलीस किरण गोसावीचा शोध घेत होते. तक्रारदार चिन्मय देशमुख याच्या माहितीनुसार गोसावीने आपल्यासह पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसविले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.