ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्याचे सांगून २९ वर्षीय तरुणीवर बलात्कार

पुणे : ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्याचे सांगून तरुणीच्या कौटुंबिक वादाचा गैरफायदा घेऊन एका तोतयाने तरुणीवर बलात्कार केला़. तसेच घरातच लग्न करुन नातेवाईकांना नोकरीचे आमिष दाखवून १६ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळ पोलिसांनी या तोतया डॉक्टराला अटक केली आहे. हा प्रकार मार्च ते २६ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला आहे.

नायका रुद्रा रमेशराव ऊर्फ किशन रमेशराव जाधव(वय ३३, रा. विमाननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरीत राहणार्‍या एका २९ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने तो डॉक्टर असून ससून हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहे. तसेच त्याचे नर्सिंगचे कॉलेज व फार्मसीचे कॉलेज आहे. असे फिर्यादी यांना सांगून त्यांना ऑफिसमध्ये बोलावले होते. त्यांना खोटे आयकार्ड व वैदयकीय पदवीची कागदपत्रे दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.

फिर्यादी यांचे कौटुंबिक वादाचा फायदा घेऊन त्यांच्याशी जवळीक साधून त्यांच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. जबरदस्तीने घरामध्ये लग्न करुन त्यांना विश्वासात घेतले.
तसेच फिर्यादी यांचे नातेवाईकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एकूण १६ लाख ६५ हजार रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केली. फिर्यादी यांचे अश्लील फोटो काढून लोकांना ते फोटो पाठवून त्यांची बदनामी केली. फिर्यादी व फिर्यादीचे पतीला जीवे मारण्याची तसेच फिर्यादीचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.तु माझे ऐकले नाहीस तर मी नोकरी लावण्यासाठी घेतलेल्या पैशांच्या व्यवहारामध्ये अडकवण्याची धमकी दिली होती. यामुळे फिर्यादी या बदनामी होईल या भितीने आजपर्यंत त्यांनी तक्रार दिली नव्हती.
शेवटी त्यांनी धीर धरुन पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या तोतयाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जोगन तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.