शिरूर तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या दरोडा प्रकरणातील आरोपी जेरबंद

पुणे :  पिंपरखेड तालुका शिरूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या दरोडा प्रकरणातील आरोपी जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.  याप्रकरणी मुख्यसूत्रधारासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अतिशय नियोजनपूर्वक हा दरोडा आरोपींची टाकला होता. भरदिवसा हा दरोडा पडल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

डॉलर ऊर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ, ( रा वाळद, ता. खेड), अंकुर महादेव पाबळे (रा कावळपिंपरी, ता. जुन्नर), धोंडीबा महादु जाधव (रा. निघोज कुंड, ता. पारनेर, जि. अ.नगर), आदिनाथ मच्छिंद्र पठारे, (रा. पठारवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), विकास सुरेश गुंजाळ,( रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

२१ ऑक्टोबर रोजी भरदिवसा पावणे दोन वाजेच्या सुमारास मध्ये पिंपरखेड तालुका शिरूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर पाच जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा घातला होता.याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा पथकास सदरचा गुन्हा डॉलर ऊर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ याने त्याच्या साथिदारासह केला असल्याची माहीती खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. आरोपीचा शोध घेत असताना तो गुन्हा केल्यानंतर मध्यप्रदेशमध्ये गेल्याची माहीती प्राप्त झाली. त्या माहिती नुसार त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेश येथे रवाना केले. त्यानंतर आरोपी हा अहमदनगर जिल्ह्यातील निघोज, ता. पारनेर येथे येणार असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने नमुद आरोपीस निघोज येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने इतर चार साथीदाराच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.