शिविगाळ केल्याच्या रागातून वडिलांचा खून, आरोपी मुलाला अटक; मावळ तालुक्यातील घटना

पिंपरी : वडिलांनी आई, मुलगा आणि इतर सदस्यांना शिवीगाळ केली. या कारणावरून मुलाने वडिलांना धक्काबुक्की करत कठड्यावर ढकलून देत त्यांचा खून केला.ही घटना गुरुवारी (28 ऑक्टोबर) रोजी सकाळच्या सुमारास मावळ तालुक्यातील  चंदनवाडी-चांदखेड येथे घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

राजू शंकर पारधे (वय ५३) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. त्यांचा मुलगा गणेश राजू पारधे (वय २८, रा. चंदनवाडी, चांदखेड, ता. मावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश कांबळे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजू पारधे हे आरोपीचे वडील होते. त्यांनी त्यांची पत्नी मंजुळाबाई, मुलगा गणेश आणि घरातील इतर सदस्यांना शिवीगाळ केली. या कारणावरून गणेशने वडील राजू यांना धक्काबुक्की केली. तसेच घरासमोरील दगडी कठड्यावर ढकलून दिले. राजू पारधे दगडी कठड्यावर जोरात आपटले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी गणेश याला अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.