एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात थांबवून अल्पवयीन मुलीशी केले अश्लील कृत्य ; जळगाव परिसरातील घटना
जळगाव :गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर येत असताना, एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने अल्पवयीन मुलीला भर रस्त्यात अडवून अश्लील कृत्य केलचं. पण तिला त्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमातंर्गत संबंधित तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुलदीप रवींद्र सपकाळे असं गुन्हा दाखल झालेल्या तरूणाच नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने फिर्याद दिली आहे
मिळालेल्या माहितीनुसार,कुलदीप सपकाळे हा धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील रहिवासी आहे. त्याचे गेल्या काही दिवसांपासून गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. एकतर्फी प्रेमातून तो पीडित मुलीचा अनेकदा पाठलाग करायचा.
दरम्यान, गुरुवारी पीडित मुलगी आपल्या एका मैत्रिणीसोबत कामानिमित्त बाहेर गेली होती.अग्रवाल चौकातून दोन्ही मुली जात असताना पीडितेला कुलदीपने भर रस्त्यात आडवले. ‘तू फक्त माझी आहेस, आणि तू माझी झाली नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’ अशा शब्दांत आरोपीनं पीडितेला धमकी दिली. कुलदीपने पीडितेच्या मैत्रिणीलाही अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने थेट जिल्हा पेठ पेालीस ठाण्यात तरूणाविरोधात फिर्याद दिली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!