डिस्काउंटमध्ये गाडी आणि चॉईस नंबर देण्याच्या बहाण्याने रजिस्ट्रेशन न झालेली जुनी गाडी देऊन फसवणूक

पिंपरी चिंचवड : डिस्काउंटमध्ये गाडी आणि चॉईस नंबर देण्याच्या बहाण्याने रजिस्ट्रेशन न झालेली जुनी गाडी देऊन एकाची सव्वा लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मार्च ते 29 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पिंपरीत घडला.

आकाश दशरथ पवार (वय 35, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महेश कृष्णा हेमगुडे (वय 27, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी शुक्रवारी (दि.29) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना डिस्काउंटमध्ये गाडी आणि चॉईस नंबर देण्याचे आश्वासन दिले. त्यापोटी कागदपत्रे आणि टप्याटप्याने सव्वा लाख रुपये घेतले. तसेच, रजिस्ट्रेशन न झालेली जुनी गाडी फिर्यादी यांना देऊन त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.