पुण्यात भरदिवसा ७० वर्षीय महिलेचा खूनकरून घरातून पावणे दोन लाखांचे दागिने चोरले

पुणे : सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात ७० वर्षीय महिलेचा खून करून घरातून पावणे दोन लाखांचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी ११ ते रात्री १० या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
शालीनी बबन सोनावणे (वय ७०) असे खून झालेल्या या जेष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हिंगणे खुर्द परिसरात राहतात. त्यांची आई शालीनी या देखील त्यांचे समोरील सोसायटीत एकट्या राहत होत्या. दरम्यान शनिवारी रात्री तक्रारदार घरी आल्यानंतर त्यांना रात्री साडे नऊ वाजता आईकडे गेले. त्यावेळी त्यांना आई हॉलमध्ये पडल्याची दिसून आली. त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. त्यानंतर सिंहगड रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांनी घराची पाहणी केली. त्यावेळी घरातून पावणे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.

जवळच्यावरच संशयाची सुई…

सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. शालीनी यांच्या गळ्यात ४ ते ५ तोळे सोने होते. ते तसेच होते. त्याला हात लावला गेला नाही. तर कपाटात रोकड व इतर दागिने देखील होते, तेही तसेच आहेत. शालीनी या ओळखीचा असेल तरच घरात घेत असत. त्यामुळे हा खून जवळच्या कोणी केला आहे का याची शक्यता धरून पोलीस तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.