लग्नाचे अमिश दाखवून बलात्कार ; 15 वर्षीय मुलगी गरोदर

पिंपरी चिंचवड : लग्नाचे अमिश दाखवून 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना  जून ते 29 ऑक्टोबर 2021 या कालावधीत एमआयडीसी भोसरी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे

कैलास शहाजी पाटोळे (वय 19, रा. एमआयडीसी भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या 15 वर्षीय मुलीला लग्नाचे अमिश दाखवून तिच्याशी जवळीक साधली.आरोपीने त्याच्या दुचाकीवरून नेऊन पीडित मुलीला त्याच्या
घरी आणि एच ए कॉलनीच्या पाठीमागील गेटजवळ खोलीत नेऊन तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केला. पीडित मुलगी यामुळे गरोदर राहिली. हा प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास येताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.