लिंबु सरबतातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडित मुलगी गरोदर ; पुण्याच्या धनकवडी परिसरातील घटना

पुणे : लिंबु सरबतातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रकार समोर आला आहे.सदर मुलगी गरोदर असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर सदर घटनेला वाचा फुटली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना ऑगस्ट २०२१ मध्ये घडली होती.

आदर्श महेश कुलकर्णी (वय १९, रा. धनकवडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ऑगस्टमध्ये आरोपीने फिर्यादीला आपल्या फ्लॅटवर बोलावले होते. तेथे त्याने लिंबु सरबतातून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे फिर्यादी बेशुद्ध झाल्या. तेव्हा आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या शरीर संबंधातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गुप्ता अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.