संतोष जगताप हत्याकांडातील मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात; दहा दिवसांची पोलीस कोठडी

लोणी काळभोर: ऊरूळी कांचन ( ता. हवेली ) येथे झालेल्या संतोष जगताप हत्याकांडातील मुख्य सुत्रधारास पिर फाटा ( ता. शिरूर ) येथे लोणी काळभोर पोलीसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

उमेश सोपान सोनवणे ( वय , रा. राहु, ता. दौंड ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी पवन गोरख मिसाळ ( वय २९ ) व महादेव बाळासाहेब आदलिंगे ( वय २६, दोघे रा. उरूळी कांचन ता. हवेली ) यांना अटक करण्यात आली असल्याने याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या तीन झाली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे वाळू व्यावसायिक संतोष जगताप याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात जगताप जागीच ठार झाला, तर त्यांचे अंगरक्षक शैलेंद्रसिंग व मोनुसिंग हे गंभीर जखमी झाले होते. यावेळी जगताप याचे अंगरक्षकाकडून केलेल्या फायरींगमध्ये मारेक-यामधील स्वागत बाप्पू खैरे ( वय २५, रा. दत्तवाडी, ऊरूळी कांचन, ता. हवेली ) हा जागीच ठार झाला होता.

त्यापैकी पवन मिसाळ व महादेव आदलिंग या दोघांना पळसदेव (ता. इंदापूर) येथून अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासदरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा उमेश सोनवणे याचे सांगणेवरून कट रचून केल्याचे निष्पन्न झाले होते. परंतू सोनवणे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेणेसाठी वरीष्ठ पोलीस निरीक्ष राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकास आदेश दिले होते. त्याअनुषंगाने तपास पथक सोनवणे याचा शोध घेत असताना तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांना सोनवणे हा गुरुवार २८ ऑक्टोबर रोजी रात्री कानिफनाथ हॉटेल, पिर फाटा, ता. शिरूर येथे येणार असलेबाबत माहीती मिळाली.

त्यानुसार महानोर यांनी मोकाशी यांना कळवून त्यांचे आदेशाप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार  नितीन गायकवाड, गणेश सातपुते, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संभाजी देविकर, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंके यांचेसमवेत सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला. काही वेळाने थांबले असताना बातमीप्रमाणे उमेश सोनवणे हा हॉटेल नजीक आलेचे निदर्शनास येताच तपास पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला गुन्हयात अटक करून आज  न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी त्याला १० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर नामदेव चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ नम्रता पाटील, हडपसर विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त  कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक सुनील नागलोत, अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, संभाजी देवकर, पोलीस शिपाई बाजीराव वीर, निखिल पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंखे या पथकाने केली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.