लग्नात हुंडा न दिल्याने विवाहितेचा छळ, पतीसह एका महिलेच्या विरोधात गुन्हा

पिंपरी चिंचवड :लग्नात हुंडा न दिल्याने सासरच्या लोकांनी विवाहितेला मारहाण केली. तसेच जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देत पतीने शाररिक व मानसिक छळ केला.याप्रकरणी पतीसह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार जानेवारी 2020 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली.

पती सचिन वसंतराव जमादार (रा. उमरगा, जि. उस्मानाबाद) आणि महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेच्या लग्नात तिच्या माहेरच्या लोकांनी हुंडा, सोने, किमती वस्तू तसेच लग्नात मानपान दिला नाही. यावरून आरोपींनी सतत बोलून विवाहितेच्या माहेरच्या लोकांचा अपमान केला. पतीने स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.