ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचे तयारीत असलेली हत्यारबंद टोळी जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट ३ ची कामगिरी
पुणे : ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचे तयारीत असलेली हत्यारबंद टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक लोखंडी कोयता, नायलॉनची दोरी, मिरची पुड, चाव्या, रोख रक्कम ५०० व २ दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपींकडून ५ गुन्हे उघडकीस आणले आहे.
आजीम सलीम शेख (वय २२ रा.कॉलनी नं १०,म्हसोबा मंदीरा शेजारी, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे), हंसराज संजय परदेशी (वय २१, रा.म्हसोबामंदीर शेजारी, ३११ भवानी पेठ,काशेवाडी, पुणे), योगेश बाबा चौधरी (वय-२४ , रा म्हसोबा मंदीर, १० नं कॉलनी समोर, काशेवाडी, भवानीपेठ, पुणे), अजय खंडु कदम (वय-३० रा. चमनशहा चौक, काशेवाडी, भवानीपेठ, पुणे), संतोष विष्णु अडसुळ, वय २२, रा.कॉलनी नं १०,म्हसोबा मंदीरा शेजारी, काशेवाडी, भवानी पेठ पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट तिनचे पोलिस नियमित पेट्रोलींग करित असताना त्यांना माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्ड वरिल सराईत गुन्हेगार आजीम शेख व त्याचे साथीदार हे पंचतारा बिल्डींग मधील मातोश्री ज्वेलर्स, सर्व्हे नं- १३२ दांडेकर पुल, पुणे या दुकानावर दरोडा टाकण्याचे तयारीत दांडेकर पुल, बस स्टॉप जवळ सार्वजनिक रोडचे कडेला दबा धरुन थांबलेले आहेत. आणि ज्वेलर्सचे दुकान लुटण्याच्या तयारीत आहेत.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानकपणे सदर ठिकाणी छापा टाकुन आरोपींना ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी चोकशी केली असता ते सर्वजण खरी माहिती सांगणेस टाळाटाळ करीत होती. ताब्यात घेतलेल्या ५ आरोपीपेकी ४ आरोपी हे रेकॉर्ड वरिल गुन्हेगार असून पुणे शहरात खडक, लष्कर, दत्तवाडी या पोलीस ठाण्यात त्यांचे विरुध्द घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहे.
त्याच्याकडून एक लोखंडी कोयता, नायलॉनची दोरी, मिरची पुड, चाव्या, रोख रक्कम ५०० व २ दुचाकी असा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांच्याविरूद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात असा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीची पोलीस कस्टडी घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडुन ५ गुन्हे उघड करण्यात आले
असुन एकुण १ लाख १६ हजार १० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे शहर श्रीनिवास घाडगे,
सहा.पोलीस आयुक्त गुन्हे-१ लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, सहा.पोलीस निरीक्षक अमृता चवरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे,अंमलदार संतोष क्षिरसागर राजेद्र मारणे,महेश निबांळकर विल्सन डिसोझा, संजिव कंळबे,कल्पेश बनसोडे,सुजित पवार(चा),सोनम नेवसे, दिपक क्षिरसागर,प्रकाश कट्टे, ज्ञानेश्वर चित्ते,राकेश टेकावडे,भाग्यश्री वाघमारे यांचे पथकाने केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!