पहिले लग्न झालेले असल्यांचे लपवून महिलेला लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार; फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

पिंपरी चिंचवड : स्वतःचे लग्न झालेले असताना एका भामट्यांने लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने तिला उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना जून 2020 ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत  घडली आहे.

तुषार रोहिदास मस्कर (वय 32, रा.काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार याचे लग्न झालेले आहे. असे असतानाही त्याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर.वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला. फिर्यादी
महिलेने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता तिला उडवाउडवीची उत्तरे दिली. लग्न करण्यास नकार देऊन फिर्यादी महिलेला आरोपीने शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच फिर्यादी
महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.