घाटकोपरमध्ये तोंड, हात, पाय बांधून महिलेची हत्या
मुंबई: तोंड, हात, पाय बांधून महिलेची हत्या केल्याची घटना घाटकोपरच्या पंतनगरमध्ये पंतनगरच्या शिवाजी इनस्टिट्युट समोर, भाजी मार्केट चौक, बिल्डिग नंबर ३८ व ३९ च्या मोकळ्या जागेत घडली आहे. मृत महिलेच्या डोक्याला, पाठीवर जखमा पोलिसांना आढळून आल्या आहेत.
आरोपीने या महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. या महिलेची अद्याप ओळख पटली नसून पंतनगर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!