पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन तरुणाचे अपहरण करुन त्याचा खुन ; पोलीसांना चकवण्यासाठी उभी केली दृश्यम चित्रपटासारखे साम्य असलेली परिस्थिती

पिंपरी चिंचवड : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन तरुणाचे अपहरण करुन त्याचा खुन केला. त्यानंतर मृतदेह दारूच्या भट्टीत रात्रभर जाळला. मृतदेहाची हाडे आणि त्यासोबत एका शेळीचा मृतदेह दोन पोत्यात भरून पोते नदीवर आणि नाल्यात टाकून त्याची विल्हेवाट लावली. पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपीने उभी केली दृश्यम चित्रपटासारखे साम्य असलेली परिस्थिती मात्र हिंजवडी पोलिसांनी या खुनाचा उलगडा करून याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

लंकेश सदाशीव रजपुत ऊर्फ लंक्या (रा. बावधान बु. पुणे), गोल्या ऊर्फ अरूण कैलास रजपुत (रा. बावधान बु. पुणे), सचिन तानाजी रजपुत (वय 25,.रा. कासारआंबोली भवानी नगर, ता. मुळशी जि.
पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन येथील भरत उर्फ भुषण शंकर चोरगे (वय 27, रा. बावधन बु. पुणे) याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. 21 ऑक्टोबर रोजी त्या तरुणाने त्या महिलेला रात्री दोन मिसकॉल दिले. त्यावेळी महिलेच्या पतीने मिसकॉल पाहिल्यावर पत्नीला विचारणा करून तिला मारहाण केली. मारहाण केल्याने महिला पळून गेली. दरम्यान संपर्क न झाल्याने तिचा प्रियकर मयत भुषण चोरगे त्याठिकाणी महिलेस भेटण्यासाठी
आला. संबंधीत व्यक्ती आल्याचे कळताच महिलेच्या पतीने व त्याचे दोन साथीदार यांनी मिळून त्याला मारहाण करून त्याला धारधार
शस्त्राच्या सहाय्याने छातीवर व पोटात वार करुन.त्याचा खून केला. मृतदेह बोलेरो गाडीत घालून बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी उरवडे गावात असलेल्या त्याच्या दारुच्या भट्टीमध्ये त्याला रात्रभर जाळले.

मृतदेह जाळल्यानंतर त्याची राख व इतर अवशेषाची घोटावडे परीसरातील नदीवर व नाल्यात टाकून विल्हेवाट लावली. त्यानंतर त्याचा एक खुनामध्ये सहभागी नसलेला सहकारी सचिन राजपुत यास मयत भुषण चोरगे याची बॉडीची राख व अवशेष पोत्यात भरुन उरवडे येथील एका नाल्यात टाकली आहे असे सांगून मुख्य आरोपी मध्यप्रदेश येथे पळून गेले.

दरम्यान भुषण चोरगे रात्री घरी आला नाही म्हणून त्याची आई शांता शंकर चोरगे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात भुषण हरवल्याची तक्रार दिली. या मिसिंगचा तपास करताना संशयित लंकेश राजपुत याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने काहीएक उपयुक्त माहीती दिली नाही. दरम्यान, भुषण चोरगे मिसींग झाल्याच्या दुसऱ्या दिवशी भुषण चोरगे यांच्या आईला त्याची एकच चप्पल संशयित लंकेश राजपुत याच्या घरासमोर मिळाली. तसेच भुषण व लंकेश यांची 21 ऑक्टोबर रोजी रात्री वादावादी झाल्याचेही पोलिसांना समजले.

पोलिसांनी आरोपी लंकेश राजपुत, गोल्या ऊर्फ अरूण रजपुत, सचिन रजपुत, व त्याचा इतर एक साथीदार यांनी भुषण चोरगे यांचे अपहरण केल्या बाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात संशयित आरोपी म्हणून सचिन राजपुत याला अटक करून त्याच्याकडे तपास केला असता त्याने मुख्य आरोपी लंकेश राजपुत व अरुण राजपुत अशा तिघांनी
मिळून मध्यप्रदेश येथे पळून जाण्याच्या अगोदर भुषण चोरगे यांचा खुन करुन बॉडी जाळल्याचे व राख टाकून देऊन विल्हेवाट लावल्याचे सांगितले.

राख टाकलेले ठिकाण आरोपीने दाखवले असताना उरवडे गावाच्या नाल्यात दोन पोती मिळाली. त्यामध्ये शेळीची बॉडी कापून टाकली असल्याचे दिसले व पोलीसांना चकवण्यासाठी सदरची व्युहरचना केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यानच्या काळात फरारी मुख्य आरोपी लंकेश व त्याचा साथीदार अरुण यांचा शोध घेत असता ते दोघे मध्यप्रदेश येथे लपून बसले आहेत अशी बातमी मिळाल्याने एक टिम तयार करून मध्यप्रदेश येथे जाऊन आरोपींना अटक केली.

आरोपी लंकेश राजपुत व त्याच्या साथीदाराने सुरूवातीला भूषण चोरगे याच्या खुनाबावत काहीही पुरावा मागे रहाणार नाही व पोलीसांना शंका आली तरी ज्या प्रमाणे दृष्यम चित्रपटामध्ये मयत इसमाची डेड बॉडी मिळत नाही व त्यामुळे पोलीस आरोपीला पकडत नाहीत, असे समजून मयताची डेड बॉडीची विल्हेवाट
लावली व नंतर पोलीसांना चकवण्यासाठी एका पोत्यामध्ये शेळी मारून नाल्यामध्ये टाकुन दिली. व ती डेड बॉडी पोलीसांना मिळावी या साठी त्याचा तीसरा सहकारी सचीन राजपूत यास शेळी टाकल्याचे ठिकाण दाखवून ते स्वतः फरार झाले. परंतु पोलीसांनी कौशल्याने तपास करून आरोपींना मध्यप्रदेशातून ताब्यात घेवून खुन केल्यची हकीकत निष्पन्न करून दाखल गुन्हा उघड केला आहे.

दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल दहीफळे हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश,

अप्पर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, सहा.पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सांवत, पोलीस निरीक्षक साो.(गुन्हे), अजय जोगदंड, सुनिल दहिफळे ,(गुन्हे) तपास पथकाचे प्रमुख सपोनि,सागर काटे साो, गणेश खारगे, पोउनि समाधान कदम, पोउनि साळुखे, सहा.पोलीस उप-निरिक्षक बंडु मारणे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, तानाजी टकले, कुणाल शिंदे, महेश मोहोळ, विनोद मोहीते, रितेश कोळी, शिवराम भोपे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे, झनकसिंग गुमलाडु, सुभाष गुरव, रवी पवार, अमित जगताप, भाग्यश्री जमदाडे, रेखा धोत्रे यांनी केली आहे.
.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.