येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर दुचाकी रॅली काढणा-या मुख्य आरोपीसह तिघांना अटक

पुणे :  येरवडा कारागृहातून गंभीर गुन्हातून जामीनावर सुटल्यानंतर त्याच्या साथीदारांसह मिरवणूक काढणा-या मुख्य आरोपीसह तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने अटक केली आहे.

वैभव ऊर्फ पप्या शांताराम उकरे (वय-22 रा. कर्वेनगर), सुयश उर्फ मनोज संजय दिघे (वय-22 रा. कर्वेनगर), आशिष उर्फ शुटर मच्छिंद्र माने (वय-22 रा. वडारवस्ती, कर्वेनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्या उकरे विरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात उकरे व त्याचा साथीदार येरवडा कारागृहात होता. त्या दोघांना 8 ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला होता. जामीनावर बाहेर आल्यानंतर वैभव, सुयश आणि आशिष यांच्यासह 30 ते 35 जणांच्या टोळक्याने येरवडा कारागृह ते कर्वेनगरपर्यंत दुचाकीवर रॅली काढली होती.

याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, रॅली काढणारा वैभव उकरे,
मनोज दिघे हे दोघे हॉटेल खुशबू, पौड रोड, कोथरूड, पुणे येथे आले असल्याची अशी माहिती गुन्हे शाखेच्या  खंडणी विरोधी पथक एकच्या पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या कडे अधिक विचारपूस करता त्यांनी दाखल गुन्हा करते वेळी त्यांच्या सोबत आशिष ऊर्फ शुटर मच्छिंद्र माने व इतर साथीदार असे आरोपी सोबत असल्याचे सांगितले. दाखल गुन्हयामध्ये ताब्यात घेतलेला आरोपी नामे वैभव उर्फ पप्प्या शांताराम उकरे याच्याकडे पाहिजे आरोपीबाबत चौकशी केली असता त्याने दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी आशिष ऊर्फ शुटर मच्छिंद्र मान हा वडार वस्ती येथे त्याच्या राहते घरी आला असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तिसरा आरोपी आशिष माने याला वडारवस्ती परिसरातून अटक केली. त्याच्याकडे नमुद गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने सदरचा गुन्हा कबुल केल्याने सदर तिन्हीही आरोपींस पुढील योग्य त्या कारवाई करीता वैदयकीय तपासणी करून वारजे माळवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे

सदरची कारवाई  पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त-१, गुन्हे शाखा लक्ष्मण बोराटे, खंडणी विरोधी पथकाचे पो.नि. विनायक वेताळ, पो.उ.नि. विकास जाधव सपोफौज पांडुरंग वांजळे, सपोफौ यशवंत ओंबासे, पो.हवा. मधुकर तुपसौंदर, रवींद्र फुलपगारे, पो.ना.दुर्योधन गुरव यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.