घरगुती वादातून सासू व पत्नीवर कोयत्याने वार
पुणे : घरगुती वादातून दारुड्या पतीने कामावर गेलेल्या सासू व पत्नीवर कोयत्याने वार केल्याची गंभीर घटना सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास किरकटवाडी येथील नानानगर परिसरात घडली आहे.
सासूच्या (नाव माहित नाही) डोक्यात वार झाल्याने तीची प्रकृती गंभीर आहे तर पत्नी अश्विनी तानाजी गायकवाड (वय. 40, रा. शिवनगर,किरकटवाडी) हिलाही दुखापत झाली आहे. दोघींनाही उपचारांसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. तानाजी गायकवाड (वय 45, रा.शिवनगर, किरकटवाडी) असे हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,अश्विनी आणि तानाजी यांच्यात मागील वर्षभरापासून वाद सुरू होते. तानाजी गायकवाड हे शारीरिक व मानसिक छळ करत असल्याबाबत तीन वेळा अश्विनी गायकवाड यांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केलेल्या आहेत परंतु पोलीस दखल घेत नव्हते असा आरोप अश्विनी यांच्या वकीलांनी केला आहे. मागील वर्षभरापासून अश्विनी आणि तानाजी हे वेगळे राहत होते. अश्विनी आणि त्यांची आई दोघीही डीएसके परिसरात धुण्या-भांड्याची कामे करायला जातात. आज सकाळी किरकटवाडीतून कामावर चालत जात असताना नानानगर येथे तानाजी गायकवाड याने सासू आणि पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला यात दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत.
“घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी दाखल झाले.जखमींना उपचारांसाठी नेण्याची व्यवस्था करण्यात आली. पोलिस अधिक तपास करीत आहेत
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!