क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून मुलीला शिवीगाळ करून मारहाण

पिंपरी चिंचवड : क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून एका महिलेला व तिच्या मुलीला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच गैरवर्तन करून मुलीचा विनयभंग केला.ही घटना मावळ तालुक्यातील इंदोरी गावाच्या हद्दीत १ नोव्हेंबरला घडली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदकुमार कुसळ, मंदा कुसळ, स्वाती कुसळ, कोमल कुसळ (सर्व रा. इंदोरी गावच्या हद्दीत, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने शनिवारी (दि. ६) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नंदकुमार कुसळ यांची मुले व इतर मुले क्रिकेट खेळत असताना फिर्यादी महिलेला बाॅल लागला. तो बॉल महिलेने त्यांच्या ताब्यामध्ये घेतला. तो बॉल दिला नाही आरोपींनी फिर्यादीच्या घरामध्ये अनाधिकाराने प्रवेश करून फिर्यादीच्या मुलीला घराबाहेर आणून मारहाण केली. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून आरोपी नंदकुमार कुसळ याने तिचा विनयभंग केला. फिर्यादी व त्यांच्या मुलीला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.