पुणे : हॉटेल व्यावसायिकाला खंडणी मागणार्याला अटक, गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी
पुणे : आर्थिक वादातून हॉटेल व्यावसायिकाला धमकावून दोन लाख रुपयांची खंडणी मागणार्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. करण केविन डिवाझ (वय २३, रा़ कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
गुन्हा घडल्यापासून तो पसार झाला होता. शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट २ पथकाने त्याला अटक केली. याप्रकरणी निखील भगत (वय ४०, रा. सनश्री सोसायटी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे.
भगत यांचे मिसळ दरबार नावाचे हॉटेल असून ते त्यांनी त्यामध्ये मिली डिवाझ यांना स्नॅक सेंटर चालवियला दिले होते. आर्थिक वाद झाल्याने भगत यांनी त्यांना एक महिन्यात सेंटर खाली करायला सांगितले.त्याप्रमाणे त्यांनी सेंटर खाली केले. त्यांचा मुलगा करण व त्याच्या तीन साथीदारांनी त्यांना धमकावून खंडणी मागितली होती. तपासासाठी त्याला कोंढवा पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!