विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

चाकण;हुंड्यासाठी विवाहीत महिलेचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासु-सासरे आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात
सदर प्रकार येलवाडी, ता. खेड याठिकाणी घडला.

नेहा सचिन बोत्रे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेच्या वडीलांनी म्हाळुगे पोलीस चौकीत शुक्रवारी (दि.१२) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सचिन देवीदास बोत्रे (वय ३८), सासु मुक्ता देवीदास बोत्रे (वय ५२), सासरे देवीदास गणपत बोत्रे (वय
५८) आणि दीर निलेश देवीदास बोत्रे (वय ३२) (सर्व रा. येलवाडी, ता.खेड) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ४९८ अ,३०४ ब आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विवाहित महिलेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच, वारंवार अपशब्द बोलत मारहाण केली. अखेर त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.