लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

थेरगाव;एकाच ऑफिसमध्ये कामाला असलेल्या महिला सहका-याला जेवण बनवून देण्यासाठी घरी बोलवले आणि लग्नाचे आमिष देऊन जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर वारंवार शारिरिक संबंध प्रास्थापित केले व लग्नास नकार देऊन फसवणूक केली आहे. सदरची घटना थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश सुधाकर पाटकर (वय २६, रा. थेरगाव) गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच ऑफिसमध्ये काम करतात त्यांची मैत्री होती.आरोपीने फिर्यादी यांना एक दिवस जेवण बनवून देण्यासाठी घरी बोलावले आणि लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती बलात्कार केला. त्यानंतर वारंवार इतर ठिकाणी घेउन जात शारिरीक संबंध प्रास्थापित केले. दुस-या मुलीशी लग्न केल्याचे सांगून आरोपीने लग्नास नकार दिला व मारहाण आणि शिवीगाळ करून शारिरीक संबंधप्रस्थापित केल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.

पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.