४ अल्पवयीन टोळक्यांनी शस्त्राच्या धाकाने तरुणांना लुबाडले, आरोपी गजाआड

कोंढवा; कोंढवा पोलीस स्टेशनच्या परिसरातील बोपदेव घाटात ४ अल्पवयीन चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून दुचाकीने जाणाऱ्या दोघांना लुबाडले.

विक्रांत गारगोटे (वय २७, रा.राजगुरूनगर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, १७ वर्षे ६ महिन्यांच्या चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे राजगुरूनगर येथील रहिवासी आहेत. गुरुवारी सायंकाळी ते आपल्या एका मित्रासोबत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे येत होते. बोपदेव घाटेत आल्यानंतर नेमका
अंधार पडला. त्याचवेळी दोन दुचाकीवर पाठीमागून चौघेजण आले, त्यांनी तक्रारदारांची दुचाकी अडवून त्यांना शस्त्राच्या धाकाने धमकावले. त्यांना मारहाण केली व त्यांच्याजवळील पाकिट व त्यातील रोकड चोरून नेली.
तक्रारदार यांनी पोलीसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी काही वेळातच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.