शेअर मार्केट मधुन पैशाचे आमिष दाखवून, महिलेची १० लाखाची फसवणुक

पुणे; शेअर मार्केटचे तज्ञ असल्याचे भासवत पुण्यातील एका ३७ वर्षीय महिलेला तब्बल १० लाख रुपयांना गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईल धारकावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार,फिर्यादी या पुण्यातीलच एका खाजगी कंपनीत नोकरी करत आसुन, त्या लोहगाव परिसरात राहतात.शेअर मार्केट मध्ये त्यांचे अकाउंट असून ते त्या स्वतः हँडल करत होत्या. दरम्यान मागील काही दिवसांपासून त्यांना पनाश अँड सन्स प्रा. लि. या कंपनीच्या मोबाईल नंबरवरून फोन करण्यात येत होता. तुमचे शेअर मार्केट आम्ही हँडल करू आणि त्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळवून देऊ असे आश्वासन ते सतत दाखवत होते. दरम्यान वारंवार फोन येत असल्यामुळे फिर्यादी महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेऊन आपले शेअर मार्केटचे खाते त्यांना हँडल करण्यासाठी दिले. त्यानंतर आरोपीने त्यांना एकूण १० लाख ३१ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्यावेळी आरोपींनी त्यांना तीन ते चार महिने मोबदला देखील दिला. मात्र, त्यानंतर त्यांनी मोबदला दिला नाही व त्यांना पैसेही न देता त्यांची फसवणूक केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.