धक्कादायक!१७ वर्षीय मुलाचा १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
पुणे; पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने १५ वर्षीय
अल्पवयीन मुलीला हॉटेलवर घेऊन जात तिच्यासोबत वारंवार बलात्कार केला. या मुलीने नकार दिल्यानंतर तिला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर तिने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना पंधरा वर्षांची मुलगी आहे. सतरा वर्षाच्या मुलाने तिला मे महिन्यात लोहगाव येथील हॉटेलमध्ये नेत तिच्यावर वारंवार बलात्कार केला.या सर्व प्रकाराला विरोध केला असता शिवीगाळ करून तिला ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!