ऑटो क्लस्टरच्या पार्किंग मधून भंगार चोरण्याचा डाव, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी;चार जणांनी मिळून ऑटो क्लस्टर चिंचवड येथील पार्किंग मधून भंगार साहित्य चोरण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडला.
संतोष शाम रोकडे, दिगंबर उर्फ डिग्या कादरखान करंडे, संजय उर्फ संज्या कादरखान करंडे, आकाश उर्फ गोट्या धोत्रे (सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महेश मोहन पवार (वय २५, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटो क्लस्टरच्या पार्किंगमध्ये भंगार साहित्य पडले आहे .शनिवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास आरोपींनी पार्किंग मधून लोखंडी भंगारचे मटेरियल, लोखंडी प्लेटा, लोखंडी चॅनेल असा एक हजारांचा ऐवज चोरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी संतोष रोकडे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!