वंदनीय शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
पुणे; महाराष्ट्राच्या कणाकणात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचं स्फुल्लिंग मराठीजनांच्या मनामानात चेतवणारे शिवशाहीर वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांची आज पहाटे ५ वाजून ०७ मिनिटांनी प्राणज्योत मालवली.
वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पर्वती पायथ्याच्या पुरंदरेवाड्यात समस्त पुणेकरांच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अत्यंदर्शन घेण्यात आलं.
नामवंत साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक, व्याख्याते, ‘महाराष्ट्रभूषण’, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय १००) यांचे आज (सोमवारी) पहाटे पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांदरम्यान पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांचे पार्थिव सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या पर्वती पायथा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार असून सकाळी साडेदहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी घरी पाय घसरून पडल्याने पुरंदरे यांना दुखापत झाली होती. दरम्यान त्यांना न्यूमोनियाची लागण सुद्धा झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. पुरंदरे यांना तात्काळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
बळवंत मोरेश्वर तथा ब. मो. पुरंदरे हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या नावानेच ओळखले जात. बाबासाहेबांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झाला.
छत्रपती शिवरायांचे चरित्र घराघरांमध्ये आणि जर माणसांमध्ये पोहोचवण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे योगदान मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची संबंधित छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवण्याचे काम केले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!