गांजा बाळगल्या प्रकरणी एकास अटक; २.९४७ किलो गांजा जप्त
पिंपरी चिंचवड : गांजा बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका ३७ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन किलो ९४७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १५) रामनगर झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी पुणे येथील एका घरामध्ये करण्यात आली.
श्याम बाबु पवार (वय ३७ रा राजनगर, घर क्र ०७, ओटास्किम निगडी, मुळ रा मोजे दक्षिण वडगाव, गायरान, ता. करमाळा जि सोलापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. तर
संतोष (संपुर्ण नाव व पत्ता माहिती नाही ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक संदिप गोपिचंद पाटिल यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे दोन किलो ९४७ ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांना आढळून आला. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने याप्रकरणी ७३ हजार ६७५ रुपयांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!