पुण्यातील शिवसेना शहर उपप्रमुखाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : पुणे शहरात शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. निखील बाळासाहेब मालुसरे (२८, रा. कमल स्मृती, गाडीखाना मागे, १०५३ शुक्रवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल मालुसरे याने राहत्या घरी दुपारी १२ वाजेच्या सुमारास टेरेसवर गळफास घेऊन केली आत्महत्या केली आहे.त्यानंतर तातडीने त्याला पुण्यामधील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले आहे.
बाळासाहेब मालुसरे यांनी कोव्हीड काळात अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. मध्यंतरी शुक्रवार पेठेमध्ये त्यांनी लसीकरण केंद्र देखील सुरु करण्यात आले होते. त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याने शहरात राजकीय वर्तुळात प्रचंड मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्याचे कारण आणखी कळू शकले नाही. या घटनेविषयी खडक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!