रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडेआठ लाखांची फसवणूक

पिंपरी चिंचवड :रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडेआठ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला गेला आहे. ही घटना 3 ते 9 सप्टेंबर या कालावधीत एंजल ब्युटी पार्लर, आकुर्डी येथे घडली.

संजीवनी निलेश पाटणे (वय 25, रा. पुनावळे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुमित्रा सुशील हुले (वय 32, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनी पाटणे या महिलेने फिर्यादी यांना ‘मी रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी करते’ असे सांगितले. फिर्यादी आणि त्यांच्या भावाला रेल्वे विभागात टीसी म्हणून नोकरी लावण्याचे अमिश दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. नोकरी लावण्यासाठी संजीवनी हिने फिर्यादीकडून साडेआठ लाख रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादिस व त्यांच्या भावाला नोकरी न लावता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.