मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावसह तिघांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल; पत्नीने केले मारहाणीचे आरोप

पुणे :  पत्नीला मारहाण करत तिचा मानसिक व शारीरिक
छळ केल्याप्रकरणी मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता विरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिनेता सह त्याच्या आई- वडिलांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय 29, रा. करिष्मा सोसायटी कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहाला पती अनिकेतने 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या तीन वर्षाच्या काळात सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीच नाव मोठ होईल, या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली होती. तसेच तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला होता असे तक्रारीत म्हंटले आहे. याप्रकरणी अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आई- वडिलांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत मूळचा मुंबईचा आहे. 2018 मध्ये त्याचा आणि स्नेहा चव्हाणचा विवाह झाला आहे. स्नेहा यादेखील अभिनेत्री असून त्यांनी काही मालिका

आणि चित्रपटात काम केले आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये ही सतत वाद होत होते. यातूनच स्नेहा यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अलंकार पोलीस अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.