“देशमुखांना जेलमध्ये टाकलंत, आज ना उद्या किंमत मोजावीच लागेल!”- शरद पवार

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही, असा धमकी वजा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला दिला आहे. पवारांनी विदर्भाच्या दौऱ्यात काल (१७ नोव्हेंबर) सभेतून त्यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “राज्य चालवायचं असते ते दिलदारपणं. सत्तेचा वापर करायचा सन्मानानं. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचं. मात्र, ज्यांचे पाय जमिनीवर राहात नाहीत व सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून सत्त गेल्यावर असं घडतं, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीकास्त्र केले आहे.

देशमुखांना मनी लॉंड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयाने २९ नोव्हेंबरपर्यं कोठडी सुनावली आहे.

शरद पवार म्हणालेस, ‘मी नागपुरात आलो आहे आणि अनिल देशमुख येथे नाहीत, असं प्रथमच घडलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्याने भाजपची मंडळी अस्वस्थ झाली असून सत्ता मिळवण्यासाठी तिन्ही पक्षांतील नेत्यांच्या मागे वेगवेगळ्या एजन्सीज लावण्यात आल्या आहेत. एकनाथ खडसे, हसन मुश्रीफ, संजय राऊत, अजित पवार यांच्या कुटुंबांना त्रास दिला जात आहे. अनिल देशमुख यांची अटकही त्यातूनच झाली आहे. देशमुखांना तुम्ही तुरुंगात टाकलं असलं तरी तुरुंगातील त्यांच्या प्रत्येक दिवसाची, प्रत्येक तासाची किंमत जनता तुमच्याकडून वसूल करणार आहे’, असा इशाराच पवार यांनी यावेळी दिला.

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना नागपुरात संघटना मजबूत करण्याच्या सूचना देत नागपुरात राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचे आवाहनही केले.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार राजेंद्र जैन, पक्षाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रकाश गजभिये, प्रवीण कुंटे पाटील, ईश्वर बाळबुधे, आभा पांडे, बाबागुजर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शरद अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी केले.

अनिल देशमुख लवकरच बाहेर येणार- पटेल

यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवार यांचे आशीर्वाद अनिल देशमुख यांच्यासोबत आहेत आणि पवारांच्या आशीर्वादाने देशमुख लवकरच तुरुगांबाहेर येतील. हे माझे मत नाही तर शरद पवार यांचे मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अनिल देशमुखांना २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष न्यायालयीनं २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. देशमुखांची आज (१५ नोव्हेंबर) यांच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. देशमुखांची कोठडीची मुदत संपल्यामुळे पुन्हा त्यांना न्यायलयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने देशमुख यांना आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुखांना २ नोव्हेंबरला अटक करण्यात आले होते. तर मुंबई उच्च न्यायालयात ७ नोव्हेंबर रोजी ईडीच्या कोठडीत पाठविण्यात आले होते

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.