भा.ज.पा पिंपरी चिंचवड शहर दापोडी विभागाच्या वतीने एसटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्रातील सर्वात मोठे एसटी वर्कशॉप असलेल्या संपूर्ण राज्यामध्ये चालू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनाला दापोडी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विशाल वाळुंजकर यांच्या नेतृत्वात पाठिंबा पत्र देण्यात आले. राज्यातील निलंबन चालू असलेल्या प्रकाराची निर्लज्ज सरकारचा जाहीर निषेध म्हणुन भाजपा सचिव विशाल वाळुंजकर व शहर कार्यकारणी सदस्य आबा कोळेकर , रामदास भांडे यांनी मुंडण करून राज्य सरकारचा निषेध केला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे सचिव विशाल वाळुंजकर यांनी पाठिंबा देताना मंत्री अनिल परब यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप दुर्लक्ष करण्यासाठी एसटी कामगारांचे आंदोलन लांबवत असून, राज्यांतील हे सरकार तीन मोकळ्या मडक्यांच सरकार चालवत आहेत.

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे तमाम कामगार वर्ग व मराठी माणसांचे नेतृत्व होते ते असते तर यांच्या थोबाडात मारून तुम्हाला न्याय मिळवून दिला असता.म्हणून यातील एक तोंडावर बोट ठेवून, दुसरा कानावर हात ठेवून,तर तिसरा डोळ्यावर हात ठेवून आहे.जे इतर राज्यात होऊ शकते आपल्या राज्यात का होऊ शकत नाही, हुतात्मा भगतसिंग यांनी ब्रिटिश सरकार विरोधात अन्नत्याग करून आंदोलन केले व त्यांना दखल घेण्यास भाग पाडले,आपण तर स्वातंत्र्य काळात राहत आहोत त्यामुळे आपला विजय हा होणारच तुम्ही राज्यातील एसटी कामगारांनी आत्महत्या न करता हा लढा राज्य सरकारला झुकून आपल्याला एसटी महामंडळाचे विलीनीकरण करून आपल्याला विजयोत्सव साजरा करायचा आहे.असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य विशाल वाळुंजकर, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन गायकवाड, जिल्हा कार्यकारणी सदस्य आबा कोळेकर, अनुसूचित जाती मंडल अध्यक्ष धर्मेंद्र शिरसागर, महिला आघाडी सदस्य जयश्रीताई नवगिरे,विशाल सातपुते, मा.आयटी सेल सहप्रमुख सुधीर चव्हाण, अनुसूचित जाति मोर्चा शहर उपाध्यक्ष रामदास भांडे, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष सुभाष सिंगल, राजू कानडे, अधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते . यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व एसटी कामगारांच्या वतीने राजकुमार कोरे यांनी भारतीय जनता पार्टी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले .

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.