पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मास्कमध्ये कॉपी करण्यासाठी बसवले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस; हिंजवडीतील परीक्षा केंद्रावरील प्रकार

पिंपरी चिंचवड : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत एका परीक्षार्थीने मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील ८० केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. परीक्षा केंद्रावर आलेल्या उमेदवारांची तपासणी सुरू होती. त्यावेळी आरोपी उमेदवाराच्या मास्कचे वजन जास्त असल्याचे एका पोलिसाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मास्कची तपासणी केली.

तपासणीत मास्कमध्ये आतील बाजुस  एक MADE BY JBS कंपनीची बॅटरी तसेच बॅटरीचे बाजुला काळया वायरने जोडुन सी टाईप चार्जीग पॉईंट काढलेला तसेच तीच काळया रंगाची वायर पुढे डाव्या बाजुला आणुन तेथे काळया लाल रंगाची वायरला जोडुन तेथे एक डिव्हाईस त्या डिव्हाईसला एक सिम कार्डचा स्लॉट त्यामध्ये एअरटेल कंपनीचे सिम कार्ड त्यावर Airtel 4G असे लिहीलेले त्याचा IMSI नंबर 8991000904781081760Uव बाजुला
माईक जोडलेला व बाजुला चालु बंदचे काळे बटन असा असलेला काळया रंगाचा मास्क व दोन्ही बाजुला कानाला अडवकण्यासाठी पांढ-या रंगाच्या लेस अशा वर्णनाचे मास्क परीधान करून त्याव्दारे त्यामध्ये ईलेक्ट्रीक यंत्र बसवुन अवैद्य मार्गाने परीक्षा पास होण्याचा प्रयत्न केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलिसांच्या ७२० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यासाठी पहिला टप्पा म्हणून लेखी परीक्षा होत असून राज्यभरातून तरुणांनी अर्ज सादर झाले होते. लेखी परीक्षेत परीक्षार्थींनी दुपारी एकपासून केंद्रावर हजर राहणे आवश्यक होते. हॉलतिकिट, सध्याचा फोटो असलेले ओळखपत्र, आवश्यक आहे. कॉपी तसेच डमी परीक्षार्थी, असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंगबरोबरच कडक तपासणीही होणार होती. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली होती. पाच केंद्रांसाठी एक भरारी पथक असून पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी व इतर तीन पोलीस, असे चार जणांचा या प्रत्येक पथकात समावेश होता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.