मंतरवाडी कात्रज बायपास हायवेवर लूटमार करणारी टोळी गजाआड; 5 गुन्हे उघडकीस

पुणे: मंतरवाडी कात्रज बायपास हायवेवर तलवारी, कोयता व धारदार हत्यारांचा धाक दाखवून लूटमार करणार्‍या तिघांना गुन्हे शाखे युनिट 5 ने अटक केली. त्यांच्याकडून एक दुचाकी व पाच महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडील तपासात हडपसर, लोणी काळभोर आणि कोंढवा पोलिस ठाण्यातील एकूण पाच चोरी आणि जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

प्रफुल भारत कांबळे (21, रा. ससाणेनगर, हडपसर), परवेज हैदरअली इनामदार (20, रा. आदर्यनगर, तिरंगा चौक, काळेपडळ, हडपसर) आणि विजय बाळु सोनवणे (22, रा. जेएसपीएम कॉलेज पाठीमागे, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्याचे नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोंबर रोजी खडी मशिन चोक, कोंढवा पुणे येथे रात्रीचे वेळी मोटर सायकलवरुन जाताना फिर्यादी दिनेश जितलाल यादव (वय ३२ वर्षे रा. गल्ली नं. २. टिळेकर नगर, कोंढवा पुणे) यांना मोटर सायकल वरुन आलेल्या तीन जणांनी तलवारी सारख्या हत्यारानी धाक दाखवुन त्याचे खिशातील दोन मोबाईल फोन व रोख रक्कम 10 हजार जबरदस्तीने चोरुन नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गंभीर गुन्हे उघडकीस आणणेबाबत वरिष्ठांनी आदेशीत केलेले होते. युनिट -०५, गुन्हे शाखेचे पथकांनी गुन्हे घडलेल्या ठिकाणांपासुन सतत मंतरवाडी ते कात्रज बाय पास हा भागात पेट्रोलींग केली. तसेच पोलीस अमंलदार विनोद शिवले, अकबर शेख व महेश वाघमारे यांना मिळालेल्या बातमी वरुन व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपी प्रफुल कांबळे, परवेज हैदरअली इनामदार व विजय बाळु सोनवणे यांना चोरीचे होंडा शाईन मोटर
सायकल सह पकडुन त्यांना गुन्हयात अटक करुन कौशल्यपुर्ण तपास केला असता आरोपी परवेज हैदरअली इनामदार , विजय बाळु सोनवणे व एक विधी संर्घर्षित बालक यांनी चोरीचे मोटर सायकलचा वापर करुन कात्रज बायपास रोडवर रात्रीचे वेळी मोटर सायकलवरुन जाणारे इसमांना कोयत्याचा धाक दाखवुन त्याचे
खिशातुन मोबाईल फोन व रोख रक्कम जबरदस्तीने काढुन जबरी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

आरोपींकडून 35 हजार रुपये किमतीचा होंडा शाईन मोटर सायकल, व 62 हजार रूपये किमतीचे 5 महागडे=मोबाईल जप्त करणेत आलेले असुन त्याचेकडुन हडपसर, लोणी काळभोर आणि कोंढवा पोलिस ठाण्यातील एकूण पाच चोरी आणि जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.