नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणांची 5 लाखाची फसवणूक, पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
पुणे : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातील Tata, LG कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणांची 5 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.20) रात्री साडे आठ ते साडे दहा या दरम्यान रांजणगाव एमआयडीसीमध्ये घडला आहे.
किशोर पोपट शिंदे (रा. म्हसेखुर्द ता. पारनेर जि अहमदनगर), सुरेश बाप्पू वाळके (रा. बाभुळसर खुर्द ता. शिरूर जि. पुणे), महादेव जगन्नाथ डुकळे (रा. कोरेगाव ता. शिरूर जि. पुणे), गणेश धुमाळ (रा. औरंगाबाद) व तेजस सुतार (रा. सोलापूर)
अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी संदीप विठ्ठल पवार (वय- 23, रा. खरशिंदे ता. संगमनेर जि. अहमदनगर) यांनी आज (सोमवार) रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका मोबाईल नंबरवरून भरतीची सुवर्णसंधी, LG व TATA नामांकित कंपनीमध्ये जादा पगारावर नोकरी लावतो अशी खोटी जाहिरात दिली होती. फिर्यादी यांनी जाहिरातींमध्ये असलेला मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. आरोपींनी नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना बोलावून घेतले.
फिर्यादी यांनी त्यांच्यासोबत गावातील मित्र समर्थ भाऊसाहेब मैड, लक्ष्मण बाळासाहेब पंडित, सुयोग बाळासाहेब पंडित, महेश भाऊसाहेब पंडित यांना घेऊन राणजगाव एमआयडीसी येथे आले. आरोपींनी जादा पगाराची नोकरीचे आमिष दाखवून फिर्यादी व त्यांच्या मित्रांकडून कागदपत्रासाठी प्रत्येकी 1700 असे एकूण 8 हजार 500 रुपये घतले. पैसे घेऊन नोकरी लावली नसल्याने फिर्यादी यांनी आरोपींकडे याबाबत विचारणा केली.
त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली.
तसेच मारण्याची धमकी दिली. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या बेरोजगारीचा गैरफायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद शिंदे करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!